चेतन डांगे
जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले असून चेतन डांगे सध्या मुंबईत स्थायिक आहेत. कॉलेजला शिकत असताना खूप थोडा काळ प्रायोगिक रंगभूमीसाठी त्यांनी बॅकस्टेजला राहून काम केले. तीन एकांकिका आणि एका दीर्घांकाचे लेखनही त्यांनी याच काळात केले. 2008 पासून 2012 पर्यंत त्यांनी जाहिरात क्षेत्रात कॉपीराईटिंगचे काम पाहिले. 2012 पासून चेतन डांगे पूर्णपणे मराठी आणि हिंदी टेलिविजन सृष्टीत स्क्रिप्टराईटर म्हणून कार्यरत आहेत.
हंहं
2014 मध्ये प्रकाशित झालेला ‘रेताड’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह आहे.